बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ झालीय. रणजीत कासलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. पोलिसांनी कासलेची 10 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने कासलेला 23 पर्यंत कोठडी सुनावलीये. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी प्रकरणात कासलेवर गुन्हा दाखल आहे. तसेच ज्या वाहनात रणजीत कासले विविध ठिकाणी फिरला. ते वाहन जप्त करण्याची परवानगी पोलिसांकडून न्यायालयात मागण्यात आली.