आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्र्यांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी दिसली. 'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान टाळा' तसेच 'शिंदे समितीचा अहवाल येत नाही तोवर वक्तव्य करु नका' अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. सोबतच छगन भुजबळ आणि इतर मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची टाळावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.