जळगावमधून मारहाणीची घटना समोर आली आहे. रुग्णावर योग्य उपचार झाले नाही. म्हणून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरला मारहाण केली गेली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भारती देशमुख तपास करत आहेत.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णावर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन कामावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरला मारहाण केली गेली आहे.
याप्रकरणी रुग्णाचा नातेवाईक विक्की केजकरच्या विरोधात जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.विक्की केजकर यांनी डॉक्टर जाहिद पठाण यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला गेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भारती देशमुख करत आहे.