व्हिडिओ

Mumbai Cama Hospital : कामा रुग्णालयात डाॅक्टरांना अनावश्यक मोबाईल वापरावर बंदी

रुग्णालयात किंवा एखाद्या कार्यालयात तिथले कर्मचारी आपल्या हातातले काम सोडून सोशल मीडियावर टाईमपास करताना आपण अनेकदा पाहिले असेल.

Published by : Team Lokshahi

रुग्णालयात किंवा एखाद्या कार्यालयात तिथले कर्मचारी आपल्या हातातले काम सोडून सोशल मीडियावर टाईमपास करताना आपण अनेकदा पाहिले असेल. तासन् तास मोबाइलवर गप्पा आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर सफरिंगमध्ये वेळ घालवणाऱ्या डॉक्टरांचा नाहक त्रास रुग्णांच्या नातेवाइकांना होतो. परिणामी रुग्णांच्या नातेवाइकांना कर्मचाऱ्यांची कामे करावी लागतात. याची दखल अखेर कामा रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. डॉक्टरांना ड्युटीमध्ये आता 'मोबाइल बंदी' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खास महिलांसाठी असलेल्या, कामा रुग्णालयात मुंबईसह, राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. रुग्णालयात हजेरी पटावर उपस्थित डॉक्टर अनेकदा गायब असतात. सोशल नेटवर्किंग साइट आणि मोबाइलच्या नादात कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. ऑनड्युटी असलेल्या डॉक्टरांनी मोबाइलवर सफिंग करण्यात वेळ वाया घालवला नाही तर रूग्णांची अधिक सेवा करता येईल. मोबाइलच्या नादात काहीवेळेस रूग्णांकडे दुर्लक्ष होते. नातेवाईकांना कामे करण्याची वेळ येणार नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा