Dombivali Pink Road 
व्हिडिओ

Dombivali Pink Road: डोंबिवलीत पुन्हा प्रदुषणाचा मुद्दा चर्चेत, पुन्हा एकदा रस्ता गुलाबी

Dombivli Pollution: डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये पुन्हा एकदा केमिकल प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आला असून संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा रस्ता गुलाबी झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसी फेज 2 मधील हा प्रकार आहे. एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर आता केमिकलमुळे एमआयडीसी सम्पर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचे ही दिसून आले आहे. या केमिकलमुळे दर्प सुटला आहे, असे स्थानिकांनी सांगितले. 2020 साली हाचं गुलाबी रस्ता विषय लावून धरला होता. त्यामुळे तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती. आता 5 वर्षानी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्ग लक्ष देणार कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये रस्ता पुन्हा गुलाबी

  • रासायनिक कंपन्यांमुळे केमिकल प्रदूषणाचा संशय

  • गटारात केमिकल साचल्याने तीव्र दुर्गंधी

  • 2020 सालीही असाच प्रकार, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती दखल

  • पाच वर्षांनंतरही अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा