डोंबिवलीमधील पॅनल क्रमांक 29 मध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुकाराम नगर परिसरात भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील. यांनी केला आहे. या आरोपानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडले. निवडणूक आयोगाचे पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून पैसे वाटणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन पुरुष अनेक महिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेताच नागरिकांनी मोठा गोंधळ केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिसांना विनंती करण्यात आली हे आरोपी नाही त्यांना घेऊन जाऊ नका मात्र पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.