दोन साथीदारांमार्फत ड्रग्ज माफिया ललित पाटील पैसे वाटत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. डॉक्टर आणि पोलिसांना दोन साथीदारांकडून पैसे वाटप करत असल्याचे आरोप ललित पाटीलवर आहेत. यासोबतच ललित पाटील ड्रग्ज विक्रीतून कोट्यवधीची कमाई करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे.