शिर्डी येथील इंटरचेंज समृद्धीच्या टोलवरील कर्मचारी संपावर गेले आहे. कंपनीने थकीत वेतन न दिल्याने कर्मचारी 5 दिवसांपासून संपावर आहे. आलेले वाहन टोल न भरता जात आहे. जोपर्यंत आम्हाला वेतन आणि वेतन पावती मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर हजर होणार नाही असा पवित्रा समृद्धीच्या टोल वरील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.