व्हिडिओ

Kolhapur : सकल मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचं डोकं फोड आंदोलन आज करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील जिल्हा दांडपट्टालाठी असोसिएशनच्यावतीने दसरा चौक परिसरात हलगीच्या तालावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करत, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक डोक्यावर वार केल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागं घेतले जाणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

image

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी गुंतवणूक फायदेशीर, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Dahi Handi 2025 : गोविंदा आला रे आला... दहीहंडीच्या शुभप्रसंगी, प्रेमळ संदेशांनी साजरी करा आपुलकीची हांडी; WhatsApp, Facebook ला ठेवा हे स्टेटस

आजचा सुविचार

Sunil Tatkare On Rohit Pawar : "भाजपचा व्हायरस तुमच्याही पक्षाला लागलाय" रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल; तटकरेंच प्रत्युत्तर काय?