कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा जागांसाठी नुकतेच मतदान आणि मतमोजणी झाली आहे. त्यानंतर काही उमेदवारांनी ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेऊन त्यांच्या फेर चाचणीची मागणी केलीय. निवडणूक आयोगाने याबाबतची सुविधा दिलेली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले,कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि चंदगड मतदारसंघातील काही उमेदवारांनी याबाबत मागणी केली. त्यानुसार या पाच मतदारसंघातील मतदान यंत्राची फेर चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी विहित शुल्कही भरलेले आहे. 8 जानेवारी नंतर ही प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले.त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. ईव्हीएम यंत्रामध्ये पारदर्शक मतदान होत नाही अशी भूमिका घेतल्याने ऋतुराज पाटील, राजेश लाटकर ,राजू आवळे, राहुल पाटील यांनी याबाबत आक्षेप घेऊन अर्ज दिले आहेत. त्यानुसार फेर तपासणी होणार आहे.