मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सर्व पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा समन्वयक ठरण्याची शक्यता आहे. तसंच अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल.