जालन्यामध्ये लोखंडी सळईचा ट्रॅक पलटून अपघात झाला. जालना -अबंड रोडवरील रामनगर तांड्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्सार जब्बार बागवान असे मृत्य चालकाचे नाव आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.