नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशिष्ट प्रकारची पावडर वापरुन नाशिकच्या निफाड परिसरात दूध तयार करण्यात येत होते, अन्न आणि औषध प्रशासनाने ही घटना उघडकीस आणली आहे. 420 लिटर दूध कारवाई अंतर्गत नष्ट केले आहे.