अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुकताच भाजपनं सोनिया गांधी या फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक नावाच्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप केला होता. या संघटनेला अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस निधी पुरवतात. ही संघटना काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची मागणी करत आहे.
अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्यासाठी स्वत:चा अजेंडा चालवणारी व्यक्ती म्हणून 94 वर्षीय सोरोस यांची ओळख आहे. तसंच सोरोस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचे कट्टर टीकाकारही बोललं जातं. सोरोस यांचा पाठिंबा असलेल्या OCCRP या बिगर-नफा माध्यम संस्थेनं गेल्या वर्षी गौतम अदानी आणि अनिल अग्रवाल यांच्यावर निशाणा साधला होता. अदानी समूहाने स्वत:चे शेअर्स खरेदी करून लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता. तसंच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी देशाचे पर्यावरणविषयक कायदे कमकुवत करण्यासाठी छुप्या पद्धतीने लॉबिंग केल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं होतं. सोरोस यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी काँग्रेस आणि भाजपमध्ये काय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहा पुढील व्हिडिओमधून-