(Amravati) अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांकडून वेतनासाठी भर पावसात अडीचशे फूटवर चिमनीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येत आहे. 28 तासांपासून या कामगारांचे आंदोलन सुरु आहे.
अचलपूर येथे भर पावसात विकेश उघडे आणि मनोज सूर्यवंशी या कामगारांचे आंदोलन सुरू असून अनेक कामगार चिमणीच्या खाली बसून आंदोलन करत आहे.
अनेक महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून हे अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांची आहे.