सुखबीरसिंग बादल यांच्यावर अमृतसरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावले. गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सुखबीर सिंह बादल द्वारपाल म्हणून सेवा करत होते, त्याचवेळी गोळीबार करण्यात आला. बादलच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सैनिकानं हल्लेखोराला अडवलं. गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली आहे.