Lokshahi Update Team Lokshahi
व्हिडिओ

Video : 'पाणी नाही, तर विष द्या'; 5 जणांच्या मृत्यूनंतर नागरिकांचा संताप

महानगर पालिकेवरच गुन्हा दाखल करा, घटनेला 24 तास उलटूनही अधिकारी गाढ झोपेत

Published by : Team Lokshahi

सुरेश काटे | कल्याण

संदपगाव नजीक खाणीत बुडून एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर स्थानिक प्रशासन विरोधात गुन्हा दाखल करण्याची देसले पाड्यातील संतप्त नागरिकांनी मागणी केली. पाणी नाहीतर आम्हाला विष देऊन मारा अशा संतप्त भावना मांडल्या. (Five of family including 3 children drown in quarry at Dombivali)

लोकशाहीची टीम डोंबिवलीतील देसले पाडा परिसरातील पाणी टंचाईची दाहकता पडताळण्यासाठी गेली असता भयाण वास्तव समोर आले आहे. घरात पाणी नाही, पाणी येतं ते पण पिण्या पुरतं ...काशीबशी तहान भागवण्यासाठी एखादी कळशी भरली जाते तर कपडे धुण्यासाठी ग्रामस्थांना आजूबाजूच्या खदाणीमध्ये साचलेल्या पाण्याचा आधार घ्यावा लागतोय, ही परिस्थिती आहे. डोंबिवली जवळच असलेल्या गावांची .... काल सायंकाळच्या सुमारास डोंबिवली संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय . यामध्ये दोन महिला व तीन लहान मुलं आहेत . यापूर्वी ही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत पाणी टंचाईमुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थ या खदानी चा आधार घेतात पाणी समस्येबाबत अनेकदा महापालिकेला ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात आला निवेदने देण्यात आली. आंदोलन करण्यात आले मात्र अद्यापही या गावांचे पाणी समस्या सुटलेली नाही. शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का असा सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जातोय .

...यामुळे खदानीत जात नागरिक

मुंबई ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरे महत्वाची मानली जातात. मात्र या शहरालगत असलेल्या संदप ,भोपर ,नांदीवली ,देसले पाडासह आसपासच्या गावांची पाणी टंचाईची दाहकता समोर आली आहे. या काही भागात एम आय डी सी कडून पाणी पुरवठा केला जातो. कल्याण डोंबिवली महापालिका पाण्याचं नियोजन करते. मात्र कमी दाबाने ,अपुऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेत. पिण्याचे पाणी काही मिनिटं करता येते त्यामुळे इतर काम तर लांबच राहिले कपडे धुण्याकरता या गावातील महिला जीव धोक्यात घालून या गावच्या आजूबाजूच्या खदानीमधील पाण्याचा आसरा घेतात .

...यामुळे खदानीत जात नागरिक

मुंबई ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरे महत्वाची मानली जातात. मात्र या शहरालगत असलेल्या संदप ,भोपर ,नांदीवली ,देसले पाडासह आसपासच्या गावांची पाणी टंचाईची दाहकता समोर आली आहे. या काही भागात एम आय डी सी कडून पाणी पुरवठा केला जातो. कल्याण डोंबिवली महापालिका पाण्याचं नियोजन करते. मात्र कमी दाबाने ,अपुऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेत. पिण्याचे पाणी काही मिनिटं करता येते त्यामुळे इतर काम तर लांबच राहिले कपडे धुण्याकरता या गावातील महिला जीव धोक्यात घालून या गावच्या आजूबाजूच्या खदानीमधील पाण्याचा आसरा घेतात .

पाच जणांचा मृत्यू

शनिवारी देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. या घटनेत अपेक्षा गायकवाड 30 ,निरा गायकवाड 55 ,मयुरेश गायकवाड 15 ,मोक्ष गायकवाड 13 ,सिद्धेश गायकवाड 15 यांचा मृत्यू झाला. हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशासनाला अजून किती बळी हवेत

अशा घटनेची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी देखील खदाणीमध्ये अनेक बळी गेलेत. लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाकडून ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली जातात. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. या गावांसाठी सुरू असलेल्या पाणी योजनेच काम ही संथ गतीने सुरू आहे. नागरिक आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासनाला अजून किती बळी हवेत असा सवाल येथील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा