नागपूर: नागपूरात अखंड भारत दिनानिमित्त आज सामुहिक वंदे मातरम् कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक वंदे मातरम् कार्यक्रमात विदेशी पाहुण्यांनी देखील सहभाग घेतला आहे. इटलीवरून आलेल्या विद्यार्थीनींनी यावेळी राष्ट्रीयगीत म्हटलं आहे, शिवाय शिवतांडव देखील गायला आहे.
”भाजप आमच्यासाठी सेकंड होम आहे, इथल्या लोकांचे आदरातिथ्य आम्हाला फार आवडलं, 'अतिथि देवो भव' ही भारतीयांची संस्कृती आम्हाला भावली” अशी भावना यावेळी विदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली आहे.