व्हिडिओ

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, लक्ष्मण हाके यांची टीका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगेची भेट घेतलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झालेली आहे.

Published by : Dhanshree Shintre

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगेची भेट घेतलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झालेली आहे. चव्हाण आणि जरांगेच्या भेटीवर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. ओबीसीने फक्त मुजरे घालायचे का? अशा शब्दात याठिकाणी लक्ष्मण हाके टीका करतायेत.

ही माणसं येऊ घातलेल्या 2024 च्या निवडणूकीनंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. तुम्ही आम्ही बसा फक्त मुजरे घालत. ओबीसी बांधवांनो याचं ओडीट येऊ घातलेल्या निवडणूकीमध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागेल. कारण राजकारणाची भाषा यासाठी म्हणतोय या माणसांना फक्त निवडणूका, मतं, आपला पक्ष कसा जिंकेल, आपले आमदार-खासदार कसे निवडून येतील आणि 4 आजी माजी मुख्यमंत्री पाठिंबा देतात. या महाराष्ट्रातले सगळे आमदार-खासदार लेखी पत्र देतात आणि ओबीसीच्या आंदोलनाकडे मात्र नुसता ओबीसी हा शब्द ही माणसं उच्चरायला तयार नाहीत असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा