भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार आहे. यासाठी आखलेल्या नव्या मिशनमध्ये 4 सदस्यांचा क्रु अंतराळात जाणार आहेत. त्यामध्ये नासाच्या ॲन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, 'JAXA' संस्थाचे अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रशियाची रॉसकॉसमॉस एजन्सी किरिल पेस्कोव्ह या चौघांचा समावेश आहे. हे सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची स्पेस स्टेशनमध्ये जागा घेतील. यापूर्वी, तांत्रिक कारणांमुळे स्पेसएक्सचे केनेडी स्पेस सेंटर (फ्लोरिडा) येथून क्रू-10 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर होते. त्या मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलावे लागले होते.