नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय... त्यातील एक नक्षलवादी श्यामला हिच्यावर 8 लाखांचे तर काजलवर 2 लाखांचे इनाम होते... गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर त्यांनी आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीचा त्याग केला.
नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. त्यात कंपनी क्रमांक 10 ची सेक्शन कमांडर श्यामला झुरु पुडो ऊर्फ लीला आणि भामरागड दलम सदस्य काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी यांचा समावेश आहे. श्यामला हिच्यावर 8 लाखांचे तर काजलवर 2 लाखांचे इनाम होते. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर त्यांनी आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीचा त्याग केला.