राज्यामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील घाटकोपरची दहीहंडी देखील प्रसिद्ध आहे याठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींची उपस्थिती असते. तर दरवर्षी याठिकाणी राम कदम यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन केले जाते आणि नेहमीच त्यांची दहीहंडी चर्चेत असते. यावेळी देखील एक जोष याठिकाणी पाहायला मिळत आहे. या दहीहंडीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.