एकनाथ खडसेंनी एक खळबळजनक दावा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याची माहिती एक पत्रकाराने दिली असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ अमित शहा यांनी त्यावेळी बोलवून घेतलं आणि गिरीश महाजन यांचे सर्व कॉल रेकॉर्ड हे अमित शहांजवळ आहेत. गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सिडीआर जर तपासले तर सर्व बाहेर येईल. असा आरोप महाजनांवर करण्यात आला आहे. एका पत्रकाराने या संबंधित पुरावे दिल्याचा दावाही एकनाथ खडसेंनी केला आहे.
खडसेंनी केलेल्या आरोपांवर गिरीश महाजन भडकले
यावर प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांवर गिरीष महाजन चांगलेच भडकले आहेत. गिरीश महाजन प्रत्युत्तर देताना म्हणाले की, "एकनाथ खडसेंना आता कुठलाही जनाधार उरेलेला नाही त्यामुळे निराश होऊन खडसे असे खालच्या थराचे आणि घाणेरडे आरोप करतात. आरोप करण्यासाठी काहीही नसल्यामुळे ते नेहमी म्हणत असतात की तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन. ते आता पहिल्यांदा माझ्यावर असा आरोप करत नाहीत, त्यांनी याआधी देखील माझ्यावर असे आरोप केले आहेत. ते नेहमी बोलतं असतात माझ्याकडे सीडी आहे, जर त्यांच्याकडे खरचं काही असेल तर त्यांनी ते दाखवावं", असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.
तर त्यांच्या तोंडाला काळं फासतील - गिरीश महाजन
पुढे गिरीश महाजन म्हणाले की, "माझ्या पक्षाने मला तिसऱ्यांना मंत्रीपद दिलं आहे, मी माझं काम निष्ठेने करत आहे आणि तेच त्यांना बघवत नाही आहे. त्यामुळे ते माझ्यावर असे आरोप करत आहेत. त्यांचे जावई 3 वेळा जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्यांची बायको जेलमध्ये जाण्यापासून वाचली पण ती पुन्हा जेलमध्ये जाऊ शकते. मी जर त्यांच्या घराबाबत बोललो तर लोक एकनाथ खडसेंना बुटाने मारतील, त्यांच्या तोंडाला काळं फासतील", असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.