Shocking Video | viral video team lokshahi
व्हिडिओ

Shocking Video : तरुणीने कॉलर पकडून केली पोलिस अधिकाऱ्याला मारहाण

हा व्हिडिओ कुठला?

Published by : Shubham Tate

Shocking Video : सोशल मीडियावर एक (Social Media) अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध एका पोलिस अधिकाऱ्याची कॉलर धरलेली दिसत आहे. व्हिडीओ (Video) पाहून अंदाज बांधता येतो की, गाडीतील तरुणीच्या काही चुकीमुळे पोलिसांनी तिला थांबवले असावे. त्यानंतर आपली चूक मान्य करण्याऐवजी ती विरुद्ध अधिकाऱ्याशीच वाद घालत आहे. व्हिडिओमध्ये तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत बाचाबाची करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे? याबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु लोक सोशल मीडियावर जोरदारपणे शेअर करत आहेत. (girl grabs police officers collar in a viral video see how netizens reacts)

हा व्हिडिओ सर्वप्रथम ट्विटरवर सागर कुमार नावाच्या पत्रकाराने शेअर केला होता, व्हायरल क्लिपमध्ये रात्रीची वेळ असून एक मुलगी ट्रॅफिक सिग्नलवर एका पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान अधिकारी काहीही करत नाही आणि फक्त अपमानास्पद वागणूक सहन करतो. तरुणी अधिकाऱ्याची कॉलर धरून काही अज्ञात कारणास्तव त्याला सतत धमकावत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलीचा आवाज स्पष्ट दिसत नसून ती नशेत असून अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. ती मुलगी कधी अधिकाऱ्याचे केस पकडण्याचा प्रयत्न करायची, तर कधी त्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करायची.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bill Gates : सीईओ स्टीव्ह बॉल्मर पाचव्या क्रमांकावर; तर बिल गेट्स जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Money Doubling Scam : 'पैसे दुप्पट होतील'; असं सांगत शिर्डीत तब्बल 300 कोटींचा घोटाळा, आरोपीला बेड्या

Video Viral : माता न तू वैरिणी! चिमुकलीच्या गळ्यावर पाय, स्टीलच्या चमच्याचे चापटे; जन्मदात्या आईची पोटच्या लेकीला बेदम मारहाण

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद