यंदा ठाण्यात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचे २५ वे वर्षे आहे. या २५ वर्षाच्या प्रवासात शोभआ यात्रेत विविध संस्थांचा सहभाग असतो. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वागत यात्रेत उपस्थिती राहणार आहेत. कोपिनेश्वर न्यासचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. सकाळपासूनच ठाण्यात शोभा यात्रा आणि साहसी खेळ दाखवण्यास सुरुवात झाली आहे. या यात्रेत छत्रपती संभाजीमहाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा ठाण्यातल्या रस्त्यावर दाखवला गेला आहे.
यावेळी या शोभायात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाही मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे, एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत जनतेला हे नववर्ष सुख समृद्धी, आणि आंनदाने जावो अशी इच्छा व्यक्त केली. तसेच पुढे म्हणाले की, "सामाजिक संदेश आणि समाजप्रबोधनाचे विषय जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ठाण्यात चित्ररथाचा देखील देखावा करण्यात आला आहे. या दिवसाची ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो दिवस आला आहे, ही गुढी विजयाची आहे. ही गुढी आमच्या लाडक्या बहिणींची आहे, लाडक्या भावांची गुढी आहे, लाडक्या शेतकऱ्यांची आणि लाडक्या जेष्ठांची आहे".