गुजरात सरकारचा लहान मुलांना मोबाईल बंदीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालणाच्या गुजरात सरकारचा विचार. देशातल्या पहिल्या राज्याची लहान मुंलांच्या मोबाईल वापरावर मनाईचा विचार. मुलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम होत असल्यानं सरकार हा निर्णय लवकरच घेण्याच्या विचारात आहे. गुजरात सरकार याबाबत एक समिती बनवत आहे.
मुलांना खेळ आणि वेगवेगळ्या एक्टव्हिटीमध्ये गुंतवण्यावर भर असेल. याबाबत गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. नुकताचं आपण पाहिलं तर बोहरा समाजाने देखील लहान मुलांसाठी मोबाईल बंदीचा निर्णय घेतलेला होता. ज्यानंतर या निर्णयाचा सर्वत्र स्वागत देखील करण्यात आला होता. 15 वर्षा खालील मुलांना मोबाईल वापरण्यात बंदी आणावी असा निर्णय बोहरा समाजाने घेतलेला होता.