व्हिडिओ

Gulabrao Patil On Sanjay Raut: 'राऊतांना स्वप्न पडल्यानं ठाकरेंना स्वबळाचा सल्ला दिला असेल'

गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना उद्देशून खोचक विधान केलं आहे. राऊतांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या असतील, असं पाटलांनी म्हटलं आहे.

Published by : Prachi Nate

उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक संजय राऊत यांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या असतील, असं खोचक विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत आमचं काही म्हणणं नाही, पण त्यावेळी भाजपाला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला याचा विचार भाजप करेल, असंही पाटलांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला

याचपार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक संजय राऊत यांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या असतील. कदाचित असं स्वप्न त्यांना मागच्या काळामध्ये पडलं असतं तर आज शिवसेनेची अशी वाताहात झाली नसती, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

ठाकरे-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांवर पाटलांचं विधान

तसेच पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना भाजप एकत्र येण्याबद्दल वाद नाही व त्याबद्दल आमचं काही म्हणणंही नाही .. पण त्यांनी ज्या काळात भाजपाला मदत करायला पाहिजे होती, त्या काळात भाजपच्या विचाराला हे सोडून चालले गेले... त्या काळात भाजपाला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला याचा विचार भाजप करेल असं मला वाटतं... जो पडतीच्या काळामध्ये आपल्या सोबत असतो तो आपला भाऊ, त्यामुळे आता युती होईल किंवा नाही हा विषय जरी असला तरी भाजप शिवसेना जवळ करेल असं मला वाटत नाही... असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा