राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी LOKशाही मराठीला EXCLUSIVE मुलाखत दिलीये. यावेळी शिवसेनेतील बंडावरुन गुलाबराव पाटलांनी मनमोकळा संवाद साधला आहे. बाळासाहेबांच्या मुलाने विचार सोडले, त्या रागातून आम्ही त्यांना सोडून गेलो पण आम्हाला दु:ख देखील झालं. मातोश्री आमचं कुटुंब होतं, आमचा देव्हारा होता. आजूबाजूच्या भटजींनी देव्हारा बाटवला म्हणून देवाला सोडून गेलो.असं गुलाबराव पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना बाजूला करावं असा सल्ला देखील गुलाबराव पाटलांनी दिलाय.