एसटीच्या तिकीट दरात 15% ची वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटीच्या भाडेवाढीवरून प्रवाशांनी व्यक्त केलेल्या नाराजी वरून गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया दिली आहे. एसटी बसची स्पर्धा जर लक्झरीसोबत करायची असेल, तर भाडेवाढीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं, मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान राज्यात नव्या 5000 गाड्या आणि ई बसेस येणार असून त्यामुळे 10 ते 15% भाडेवाढ ही सहन करावी लागणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही प्रवाशांचा यामुळे फायदा होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.