धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारविषयी खरी खोटी सुनावली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या दृष्टीकोनाने न घेता तो भीतीमुळे घेण्यात आल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे". तसेच ते म्हणाले की, "बीड सरपंच संतोष देशमुख यांचे जे काही फोटो समोर आले त्यामुळे जनतेने त्यांना धारेवर धरलं असत. यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे".
तसेच मुख्यमंत्र्यांवर आरोप करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "त्यांना माहित होत चार्शीटसोबत कोणते फोटो लावले जाणार होते. धनंजय मुंडे यांचा त्या घटनेशी संबंध असल्याचं देखील त्यांना आधीच माहित होत. जर त्यांना एवढ सगळ माहित होत तर त्यांच्या राजीनाम्यासाठी 90 दिवसांची वाट का पाहिली?" असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीवर सपकाळ म्हणाले की, "तपासावर सत्ताधारी म्हणून धनंजय मुंडे यांचा प्रभाव पडावा यासाठी आम्ही विरोधीपक्ष नेते म्हणून राजीनामा मागत होतो. चार्शीट दाखवल्यानंतर राजीनामा दिला हे उशीरा सुचलेलं शाहपण म्हणायचं की नाईलाज म्हणायचा. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली कारवाई ही भयापोटी आहे, नैतिकतेच्या आधारावर केलेली नाही". असं स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेलं आहे.