Heat Wave | सूर्य आग ओकणार... देशात यंदा उन्हाळा आणखी तीव्र, हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता वाढेल, त्यामुळे कडक उन्हाळा जाणवेल.
Published by : shweta walge
यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशभरात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहील. संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.