मुंबईत रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाच्या संततधारेमुळे सखल भागात पाणी साचल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना लोकांना कसरत करावी लागते आहे. रेल्वे वाहतुकीवर देखील पावसाचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक उशीराने सुरु आहे. अशातच मंत्रालय परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देणार असून तेथील आढावा घेणार आहेत. त्याचसोबत राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा घेणार आढावा आहेत. तर, पूर परिस्थितीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे.