व्हिडिओ

Mumbai Hijab Ban In College: नामांकित महाविद्यालयात 'बुरखा' बंदी?

चेंबूरमधील आचार्य आणि डी.के मराठे कॉलेजमध्ये बुरख्या घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे

Published by : Team Lokshahi

मुंबई: काही वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये शाळेत मुलींच्या हिजाब घालण्यावरुन पूर्ण देशात अशांतता पसरली होती. या हिजाब प्रकरणामुळे देशभरात धार्मिक तेढ निर्माण झाला होता. त्यानंतर आता अशीचं काहीशी घटना महाराष्ट्रातही घडली आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये एक घटना समोर आली आहे. बुरखा घालून महाविद्यालयात आल्याने चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयबाहेर काही विद्यार्थिनांना प्रवेशद्वारावर अडवल्याचा व्हिडीओ काही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता.

यानंतर महाविद्यालयाबाहेर काही मुस्लिम संघटनांनी विरोध देखील केला. मात्र महाविद्यालयात सर्वांसाठी ड्रेस कोड असून याची कल्पना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना प्रवेश घेण्यापूर्वीच देण्यात आली होती. मात्र, काही जणांनी वातावरण बिघडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा