हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी पाच वाजून नऊ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य हादरे बसले आहेत. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील दहा ते बारा गावात भूकंपाचे हे धक्के जाणवल आहेत.भूकंप मापक केंद्रावर 3.5 अशी नोंद झाली आहे. या गावांमध्ये नेहमीच भूगर्भातून गुढ आवाज येऊन भूकंपाचे असे धक्के जाणवतात. सुदैवाने आज कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.