कोविड 19 नंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना सारख्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय. HMPV म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये HMPV च्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.
प्रामुख्यानं 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि वयस्कर व्यक्तींना या HMVP म्हणजे ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस विषाणूचा संसर्ग होतोय. या व्हायरसची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. देशातील HMPV च्या रुग्णांची संख्या 5 वर पोहोचलीये. 2 कर्नाटकात,2 तमिळनाडू आणि 1 गुजरातमधील रुग्ण असल्याची माहिती मिळतेय. तर या बाधित रुग्णांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये.