राहुल नार्वेकरांनी वरळीतील विकासकामांची पाहणी केली. नार्वेकरांनी वरळीत दोन दिवसीय वॉर्डनिहाय दौरा केला या दरम्यान ते म्हणाले वरळीत अनेक समस्या आहेत. तिथे हवी तितकी विकासकामे होत नाही आहेत, पाण्याची अडचण आहे. या सर्व्या गोष्टींकडे निश्चितच लक्ष देण्याची गरज आहे. वरळी कोणाचाही बालेकिल्ला नाही, वरळी हा काम करणाऱ्या माणसांचा बालेकिल्ला होईल. संधी दिली तर भाजपचाच उमेदवार निवडून येणार, असं राहुल नार्वेकर म्हणाले.