व्हिडिओ

Ajit Pawar News : "बिहार पॅटर्न राबवा, मुख्यमंत्रीपद द्या", दादांचा अमित शाह यांच्याकडे प्रस्ताव?

"बिहार पॅटर्न राबवा, मला राज्याचं मुख्यमंत्रीपद द्या" अजित पवारांनी अमित शाहांकडे प्रस्ताव देण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

"बिहार पॅटर्न राबवा, मला राज्याचं मुख्यमंत्रीपद द्या" अजित पवारांनी अमित शाहांकडे प्रस्ताव देण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई विमानतळावरील भेटीमध्ये अजित पवारांनी हा प्रस्ताव दिल्याचं सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांची भेटीची अंतर्गत माहिती आता लोकशाही मराठीपर्यंत सूत्रांनी पोहोचवली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही बातमी अशी वर वरची असेल, खरी नाही. निवडणूकाच व्हायच्या आहेत ना, निवडणूकांच्या आधी ते अशी मागणी करतील असं मला वाटत नाही. ही अशीच बाहेर कोणीतरी खोटी बातमी पसरवली असेल. कारण सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षातील अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशी काही मागणी त्यांनी केली असेल असे जयंत पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या