बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. नाशिकरोड येथील मुक्तिधाम परिसरात तो फिरत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पोलिसांनी तात्काळ सर्व बाबी तपासल्या. त्याचबरोबर मुक्तिधाम मंदिर परिसरात सर्च ऑपरेशन करून सीसीटीव्ही फुटेजही तपासले. आणि लॉजिंगचे रेकॉर्डही पोलिसांनी पाहिले. मात्र या सर्व तपासणीत कृष्णा आंधळेशी मिळताजुळता चेहराही समोर आला नसल्याचं पोलिसांनी तपासानंतर सांगितलं असून सोशल मीडियावर फिरणारा व्हिडीओ अफवा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.