व्हिडिओ

Thane Rave Party : ठाण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी 'ही' धक्कादायक माहिती समोर

ठाण्याच्या कासारवडवलीमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

ठाण्याच्या कासारवडवलीमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका विदेशी बाबाला आदरांजली वाहण्याच्या नावाखाली पार्टी आयोजित केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हा कथित बाबा विदेशातून गोव्यात वास्तव्यासाठी आला होता. तसेच रेव्ह पार्टीची तरुणांना सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली होती. या पोस्टसाठी विविध कोडवर्ड आणि फोटो वापरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. पोस्टमध्ये वाघ, साप, जंगलाचे फोटो वापरले गेले होते. जंगलाचे फोटो पोस्टवर असल्याने ही पार्टी जंगलात होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील वडवली परिसरातील जंगलात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीची माहिती मिळताच पोलिसांनी पार्टी उधळून लावत जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले असून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थही ताब्यात घेण्यात आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे