व्हिडिओ

Sharad Pawar Group Symbol Inauguration: किल्ले रायगडावर पवारांच्या हस्ते 'तुतारी'चं अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमनताई पाटील, राजेश टोपे यांच्यासह सर्व आमदार खासदार व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील. आज आठवणीत राहिल असा दिवस. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. जनतेचं राज्य आणावं लागेल. राज्याची स्थिती बदलण्यासाठी जनतेचं राज्य आणावं लागेल. संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. असे शरद पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा