अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे फॅशन झाली असल्याचे म्हटले होते. याच विधानावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अमित शाहवर डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. विरोधकांनी शाह यांच्या वक्तव्यावर माफी मागण्याची तीव्र मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर संसद भवनाबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे.