जगभरातील मोठ्या उद्योग समूहांसाठी भारत ही एक आकर्षक बाजारपेठ राहिली आहेत. अनेक जागतिक समस्या, युद्ध, अशांतता असतानाही गुंतवणूकदारस्नेही वातावरणामुळे देशातील थेट परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालखंडात भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) १,००० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडने (डीपीआयआयटी) दिलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे.