राज्यातील शेतकऱ्यांना जूनमध्ये पीएम किसानचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत बँक खात्यातील त्रुटी पूर्ण कराव्या असे कृषी विभागाचे आवाहन केलं आहे. नाशिक जिल्ह्यात अजूनही सहा हजार एकशे अकरा पात्र शेतकऱ्यांनी ही केवायसी प्रमाणीकरण केले नाही.
असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी प्रलंबित आहे त्यांनी ग्रामस्थरीय नूडल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.