Torres Scam 
व्हिडिओ

टोरेस घोटाळाप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांची भूमिका संशयात?

टोरेस घोटाळाप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.

Published by : Gayatri Pisekar

टोरेस घोटाळाप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टोरेस घोटाळ्यावरून मुंबई पोलिस आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर एवढा मोठा घोटाळा सुरू असताना पोलिसांना त्याची माहिती कशी नाही असा सवाल मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जून महिन्यात टोरेसच्या व्यवस्थापकांना समन्स बजावून देखील पुढे काहीच झालं नसल्यानं पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंतवणूक स्कीम किंवा संभाव्य घोटाळ्यांची माहिती घेण्याचे मुंबईतील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आदेश दिल्याचीही माहिती समोर येत आहे. तर टोरेस घोटाळाप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

काय आहे प्रकरण?

टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. "प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीतर्फे 'टोरेस' या नावाने २०२४ च्या सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करण्यात आला होता. कंपनीने सुरुवातीला दागिन्यांची विक्री केली, त्यानंतर कृत्रिम हिरे आणि नंतर रोख रकमेत गुंतवणूक स्वीकारून उच्च परताव्याचे आमिष दाखवले. प्रत्येक आठवड्यात पाच ते साडेअकरा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दिले होते. सुरुवातीला, चांगला परतावा मिळाल्यामुळे राज्यभरातील नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र, काही आठवड्यांनंतर परतावा येणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये शंका निर्माण झाली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. कंपनीने कोट्यवधी रूपये लाटून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा