बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी यासाठी जरांगे पाटील राज्य भरात मोर्चा काढण्यासाठी मराठा समाजाला आव्हान करत आहेत. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपले वक्तव्य मांडत असताना "भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे" असं म्हणतं भाजप निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, जे सत्य आहे ते आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे... भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्याच पक्षातला होता उलट तुम्ही तर सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं होत, सगळ्या आमदार आणि मंत्र्यांनी पण... भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून सर्व नेत्यांना लाज वाटली पाहिजे, कारण त्यांचा कार्यकर्ता होता तो... यांनी तुटुन पडायला हवं होत.
आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता, आदर्श होता त्याची हत्या केली.... ज्यांनी त्याची हत्या केली त्यांना जेलमध्ये टाकेन आणि या आरोपीला ज्या राजकीय नेत्याने मदत केली, साथ दिली त्याचं राजकीय करिअ नाहिस करेन असं मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्याने ठासून सांगायला पहिजे... पण हे तर काहीच करत नाही आहेत. असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.