वर्ल्ड इकोनॉमीच्या फोरमच्या अनुशंगाने सध्या स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावर असलेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 38,750 कोटींची गुंतवणूकीच्या अनुशंगाने एक मोठी कामगिरी केल्याच पाहायला मिळत आहे. पहिल्या १ तासात दावोस मध्ये 3 सामंजस्य करार झालेले आहेत.
दावोसमध्ये आजचा आणि उद्याचा दिवस महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. आज कल्याणी समूह: 5200 कोटींचा करार झाला असून हा करार गडचिरोलीसाठी असणार आहे. तर रिलायन्स इन्फ्रा: 16,500 कोटींचा करार झाला. तसेच बालासोर एलॉय: 17,000 कोटी करार झाला.
याचपार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले की, मागच्या वेळेस एकनाथ शिंदे गेले होते दावोसला यावेळेस देखील असचं भारतातील लोकांना तिथे नेऊन करार करण्यात आले. पैसा कोणता ही असो त्याचसोबत भांडवल कोणत ही असो आम्ही महाराष्ट्र मधील वाढलेली जी बेरोजगारी आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
ठीक आहे इथे भेटायला वेळ नसेल मिळाला म्हणून दावोसला गेले आणि तिथे जाऊन हा करार केला जात असेल, तर त्यावर आमच काही म्हणणं नाही. पण, जे करार होत आहेत ते भारतासाठी होत असतील तर भारतासाठी आलेली गुंतवणूक ही राज्याची गुंतवणूक म्हणून सांगू नका त्याची गणना केली तरी आमची काही हरकत नसेल. भारतातील कंपन्यांची जी गुंतवणूक आहे ती देखील वाढली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.