व्हिडिओ

Kolhapur : 'ही' ऐतिहासिक जागा ताब्यात घेण्याचे महापालिकेने दिले आदेश

Published by : Team Lokshahi

कोल्हापूर: राज्य सरकारने कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेने ताब्यात घेण्याचे आदेश काढल्यानंतर कोल्हापूरकरांनी आणि कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओ दारात आनंदोत्सव साजरा केला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि चित्रपट कलाकार तंत्रज्ञ यांनी एकत्र येत हा आनंद साजरा केला आहे.

कोरोना काळात भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले होते. यानंतर कलाकारांनी आक्रमक होत साखळी उपोषण सुरू केले होते. यानंतर तब्बल एका वर्षानंतर उशिरा का होईना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे 'चित्रपट सृष्टीचा चालता बोलता इतिहास वाचला' अशी प्रतिक्रिया कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी दिली आहे.

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित

शिवाजी पार्कात PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाकरेंची 'राज'गर्जना; म्हणाले,"समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा..."