मार्कडवाडीच्या नागरिकांनी रिचेकींगचा निर्णय घेतला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का? शासन मध्येच का पडले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्याचबरोबर लोकांना अटक केली जात असल्याबाबतही ते बोललेत. मार्कडवाडीची आग सगळीकडे लागेल असं त्यांना वाटलं आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्ही शपथ कशी घेऊ असा सवालही आव्हाडांनी केलाय. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी चर्चा करून उद्या शपथ घेण्यास सांगितले असून आंदोलन त्यानंतर करता येईल असा सल्ला दिल्याचंही आव्हाडांनी सांगितलं. समाजवादी पक्ष बाहेर पडतोय असं त्यांनी सांगितलं, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू असंही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केलं.