भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमधील विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी फुगडी खेळून आणि ढोल ताशांच्या तालावर नाचून आनंदोत्सव साजरा केला आहे. या जल्लोषात भाजप पदाधिकारी आणि महिलांचाही सहभाग पाहायला मिळाला आहे. आमच्या कर्तुत्वाचा विजय आहे असे यावेळी मंत्री अतुल सावे म्हणाले.