विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी पार पडला आहे तर त्यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. पुढचे तीन दिवस ते विधानसभेचे अध्यक्ष असतील आणि आमदारांचा शपथविधी देखील त्यांच्याच कार्यकाळामध्ये पार पडणार आहे. लवकरच विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल त्यासोबत राज्यातील आमदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम जो आहे तो हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा अध्यक्षतेखाली सुरु होईल.
उद्या आणि पर्वा अशा दोन दिवसात 288 आमदारांना ही शपथ दिली जाईल. तसेच पर्वा दुपारपर्यंत नवीन अध्यपदीचा जो उमेदवार आहे तो भाजपकडून दाखल केला जाईल. चैत्यभूमीवर कालिदास कोळंबकर यांनी अस म्हटलं होत की, "मी ज्येष्ठ आहे त्यामुळे माझा सन्मान राखावा..." त्यामुळे याच्यापुढे ही अध्यक्षपद हे कालिदास कोळंबकर यांच्याकडेच कायमस्वरुपी राहणार का?अशा चर्चा सुरु होत्या या उलट विधानसभा अध्यक्ष नारवेकर यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा माळ पडणार का? की याठिकाणी आणखी कोणत्या ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागणार हे देखील पाहण पर्वापर्यंत महत्त्वाच ठरणार आहे.